vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न     महाराजस्व समाधान शिबिरास आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती  • 78 भिल्ल कुटुंबांना घराचे पट्टेचे वितरण

अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न     महाराजस्व समाधान शिबिरास आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती  • 78 भिल्ल कुटुंबांना घराचे पट्टेचे वितरण

जालना, प्रतिनिधी) : महसुल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे अंबड येथील मत्स्योदरी देवस्थान सभागृहात यशस्वीरित्या संपन्न झाले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी आयोजित या शिबिरात अंबड शहरासह नजीकच्या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी अंबड-बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, नगराध्यक्षा देवयानी कुलकर्णी, उपनगराध्यक्ष विश्वजीत खरात, उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार विजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार नारायण कुचे म्हणाले की, महसुल विभागामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे. या शिबिरामुळे राज्य शासनाच्या विविध योजनाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. प्रशासनाने याशिबिराचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, घर बांधण्यासाठी जमिनीचा आधार लागतो. आज या वंचित घटकांना शासनाने तो आधार दिला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयामुळे गोरगरिबांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. या लाभार्थ्यांना केवळ जागेचे पट्टेच नाही, तर घरकुल आणि ५ ब्रास मोफत वाळू देखील दिली जाणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितलेजिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, महसूल विभागामार्फत विविध ठिकाणी महाराजस्व समाधान शिबिराचे यशस्वीआयोजन करुन लाभार्थ्यांना विविध लाभ दिले जात आहे. जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणा शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले. भिल्ल समाजासाठी राबविण्यात आलेला वन पट्टे वाटपाचा प्रयोग हा दिशादर्शक असून, यामुळे अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.आज आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अंबड शहरातील एकलव्य नगर येथे अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या भिल्ल जमातीतील 78 कुटुंबांना हक्काच्या घराचे पट्टे (जागेची मालकी) वितरीत करण्यात आले..यावेळी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधवासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात वाटप करण्यात आलेले विविध लाभ:• शेतकरी व आपत्तीग्रस्त मदत: नैसर्गिक आपत्ती (वीज पडणे) व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या मदतीचे वाटप.• महिला सक्षमीकरण: नगरपालिकेच्या महिला बचत गटांना 2 कोटी 75 लाख रुपयांचे अनुदान आणि छोट्या घरकुलांच्या चाव्यांचे वाटप.• कृषी यांत्रिकीकरण: ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, फवारणी यंत्रे आणि अद्ययावत ड्रोनचे शेतकऱ्यांना वितरण.• विविध प्रमाणपत्रे व योजना: महसूल विभागाचे जन्म आदेश, 7/12 उतारे, उत्पन्न प्रमाणपत्रे, आणि पुरवठा विभागामार्फत दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ जागीच देण्यात आला.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राज्य सरकार लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राज्यातील लॉटरी विक्रेता कर्मचारी सेने चे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला

vishwatmaklokswamivarta

नेदरलँड्स शिष्टमंडळाची नवी मुंबई महानगरपालिकेस अभ्यासभेट

vishwatmaklokswamivarta

द्वारका, दिल्ली | मोहन गार्डन परिसरात मोठी दुर्घटना टळली

vishwatmaklokswamivarta

वैष्णवी हत्या प्रकरण- तपास करून जालिंदर सुपेकरांना सुद्धा सहआरोपी करण्याची आवश्यकता; विधीमंडळ समितीच्या अहवालात पोलिसांवर कडक ताशेरे…

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नमुंमपामार्फत विशेष कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन