vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग 

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग

राज्य प्रतिनिधी : नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार इसापूर धरण प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. सर्व संबंधित गावातील ग्रामस्थांनी पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

नागरिकांनी कालवा, नाल्यातून बेकायदेशिर पाणी उपसा (पंपीग) करु नये व पाण्याची नासाडी टाळावी जेणेकरुन सर्व गावांना पाणी मिळणे सोयीस्कर होईल. पाणी टंचाई निवारणासाठी जलसंपदा विभाग कटिबध्द असून उर्वरित पाण्याचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे केले जाईल, अशी माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

30 मार्च 2026 च्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यासाठी 3.00 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 4.00 दलघमी व 1 मे 2026 च्या आदेशान्वये 5.00 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.

विसर्ग व लाभक्षेत्र ,इसापूर धरणातून थेट पाणी सोडण्यास्तव विमोचक नसल्याकारणाने कालवा प्रणालीमधून नियमित कालवा आवर्तनाचे वेळापत्रकाप्रमाणे संयुक्तीक होईल अशा विमोचकाद्वारे 5 एप्रिल 2026 रोजी पासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 11 मे 2026 अखेरपर्यत एकूण मागणी 12.00 दलघमी पैकी 6.81 दलघमी इतके पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आले आहे.

तालुकानिहाय गावे,नांदेड जिल्हा- गुरफळी, बाभळी, बनचिंचोली, वाटेगाव, हरडफ, धोत्रा, कामारी, पिंपरी, डोल्हारी, सिरपल्ली, सिल्लोड, एकंबा, कौठा, बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ, साप्ती, मनुला (बु), म्हाटाळा, पेवा दिघी, घारापुर, पळसपूर, डोल्हारी व विरसणी या गावांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्हा-टाकळी, राजापूरवाडी, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड, देवसरी,दिघडी, ऊंचवडद, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, भोजनगर, बिटरगाव, रतननाईकनगर, बोडका, पिंपळगाव, पेंदा, लिंगी, मुरली, मुळावा, हातला, दिवट, पिंपरी, पळशी, नागापूर, बारा चातारी, बोरी, कोप्रा, मानकेश्वर व सिंदगी या गावांचा समावेश आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी दिली.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; महाबोधी गयामंदिर : बिहार हे तिर्थक्षेत्र निश्चित ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्यासाठी २२ मे पर्यत अर्ज सादर करावा

नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

vishwatmaklokswamivarta

साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर, आई संथकुमारी यांचे 90 व्या वर्षी निधन..

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

विधानसभा लक्षवेधी सूचना :विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याची केंद्राकडे मागणी- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे