vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

“देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

मुंबई, प्रतिनिधी-देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन,खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री, पालकमंत्री, सातारा जिल्हा शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेली युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबिक परदेश सहल ठरविण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला होता.

 मात्र, देशहिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देसाई यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.राजकीय वर्तुळात या निर्णयाचे स्वागत होत असून “देश प्रथम” या भूमिकेचे हे उदाहरण मानले जात आहे.

वैयक्तिक आनंद आणि सुट्टीपेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची चर्चा आहे.देशहिताला प्राधान्य, जबाबदारीची जाणीव आणि साधेपणाचा संदेश देत शंभूराज देसाई यांनी माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पारसिक हिलवर वृक्षारोपण नवी मुंबईत आठही विभागांत 2000 हून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड..

जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण आणणार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…

श्री समर्थ सद्‌गुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त-कोप्रोली येथे उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नक्षलवादविरोधी लढाईत एक ऐतिहासिक यश-सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सीपीआय-माओवादी सरचिटणीस बसवराजू यांच्यासह २७ माओवाद्यांना कंठस्नान घातले 

vishwatmaklokswamivarta

आंतरजातीय विवाहित दांपत्यांनीआर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

vishwatmaklokswamivarta