vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी

 अमरावती, प्रतिनिधी : : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करियर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19मे 2026 रोजी ‘पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महिंद्र ॲन्ड महिंद्र, पुणे कंपनीमध्ये शासन मान्यताप्राप्त ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप’ करण्याची संधी जिल्ह्यातील उमेदवारांना मिळणार आहे.

 या मेळाव्याच्या माध्यमातून कंपनीतील हजारहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी 10 वी, 12वी आणि आय.टी.आय. उत्तीर्ण असलेले तसेच 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना एकूण 18 हजार 55 रुपये विद्यावेतन दिले जाईल. यामध्ये 9 हजार 55 रुपयांसह प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या भत्त्याचा समावेश आहे. याशिवाय उमेदवारांना कंपनीकडून जेवण आणि बस सुविधा पूर्णपणे मोफत पुरवली जाणार आहे.

 इच्छुक व गरजू उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दिलेल्या अधिकृत लिंक किंवा क्यूआर कोडद्वारे पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी 19 मे रोजी शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथील कार्यालयात स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, वयाचा व पत्त्याचा पुरावा घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 0721-2566066 किंवा 8983419799या क्रमांकावर संपर्क साधावा.******

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन

आर्थिक उन्नतीसाठी हिंदु खाटीक समाजासाठी महामंडळाच्या विविध योजना;अर्ज सादर करण्याचे आवाहन

पोलिस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर ..शहरातील फळ विक्रेता आणि रमजान ईद संबंधी व्यापाऱ्यांना वाढवित वेळ देण्याबाबत निवेदन

*विशेष वृत्त* *बालसंगोपन योजनेअंतर्गत ९७ लाखांच्या अनुदानाचे वाटप;

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाहिली सोरेन यांना श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta