vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कवठेमहांकाळ येथील शासकीय वसतिगृहात विनामूल्य प्रवेशाचा लाभ घेण्याचे आवाहन

कवठेमहांकाळ येथील शासकीय वसतिगृहात विनामूल्य प्रवेशाचा लाभ घेण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जत रोड, मेघराज टेकडी, कवठेमहांकाळ येथील वसतिगृहातील रिक्त जागेवर सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी विनामुल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलव्दारे सुरू होत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृह प्रशासनामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

       सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली या कार्यालयाच्या अधिनस्त हे वसतिगृह चालवण्यात येते. या वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व अनाथ इत्यादींना प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार इ. 8 वी ते 10 वी व 11 वी ते 12 वी आणि बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, तसेच व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहातील रिक्त जागेवर विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे सुरू होत आहे. गरजु आणि होतकरू विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 9527217728, 9763515188, 9823059773, 7058996397 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून वसतिगृहास भेट द्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – माण-खटाव तालुकास्तरीय कार्यशाळेचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आता QR कोडद्वारे तक्रार-सुचना नोंदवा;प्रशासनाचे डिजीटल पाऊल

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक आज दुपारी 12 वाजता लोकसभेत मांडले जाणार♦️आठ तास चर्चा होण्याची शक्यता चर्चेसाठी आवश्यक वाटल्यास वेळ वाढवण्यात येईल.- संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू

शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर भव्य उद्यान, मैदान व नाट्यगृहउभारावे; आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचानिधी उपलब्ध करू – नगरसेवक अश्विन अंबेकर

अमली पदार्थाविरोधात व्यापक कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta