vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बसमध्ये मिळणार विमानातील सुविधा पाच तरूणांनी एकत्रित येत घडविली ट्रॅव्हल्स क्षेत्रात क्रांती

बसमध्ये मिळणार विमानातील सुविधा पाच तरूणांनी एकत्रित येत घडविली ट्रॅव्हल्स क्षेत्रात क्रांती

ठाणे – प्रतिनिधी- बसप्रवासात एखाद्या प्रवाशाला नैसर्गिक विधी करावयाची असल्यास गाडी थांबवावी लागते. अनेकदा तर बस लागणाऱ्या प्रवाशांचा इतर प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या सर्व समस्यांवर मात करून बिनत्रासाचा आणि निर्धोक प्रवास करता यावा, यासाठी एका ठाणेकरासह पाच तरूणांनी चक्क रेल्वे आणि विमानातील सुविधा पुरवता येतील, अशी बसगाडी रस्त्यावर उतरविली आहे.

 वेलो बस या कंपनीचा संचालक शैलेश बोरणारे के. व्हि. शेट्टी, दिलीप मानकुंबरे, पंकज सिंग आणि सुनील काटकर या पाचजणांनी प्रवासी वाहतुकीमध्ये क्रांती घडविणारी आंतरराज्यीय बससेवा सुरू केली आहे. सोमवारी या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.

वेलो बस या नावाने ही बससेवा मुंबई ते हैदराबाद, मुंबई ते इंदोर- उज्जैन, मुंबई ते गोवा, मुंबई- बेंगळुरू, आणि हैदराबाद ते गोवा मार्गावर धावणार आहेत. या बसमध्ये आरामदायक सिट्ससह फायर अलार्म, अग्निशमन यंत्रणा, लक्झरी सिट्स , सीसीटीव्ही, बेडशिट- ब्लँकेट, चार्जर 6 ते 7 आपत्कालीन मार्गासह बसमध्येच ऑनबोर्ड प्रसाधनगृहाचीही सुविधाही देण्यात आली आहे. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या बीएस 6 प्रणालीच्या या बसगाड्या अत्यंत आरामदायी आणि वेगवान प्रवासाची हमी देणार्‍या असणार आहेत. शिवाय, बसमध्ये पाणी आणि इतर सुविधाही देण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सव 50 बस सुरू करण्यात आल्या असून देशभर 500 बसगाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे शैलेश बोरणारे यांनी सांगितले. दसऱ्याच्या मुहुर्तावर या बसगाड्या रस्त्यावर धावणार आहेत. या सेवेबद्दल अधिक माहिती www.velobus.in⁠ या संकेतस्थळासह 8655808153, 8655808154, 8655808155, 8655808156 या क्रमांकावर मिळेल, असे शैलेश बोरणारे यांनी सांगितले

0000

संबंधित पोस्ट

पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ साठी जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न

जालना महानगरपालिका कार्यालयातील मा. महापौर यांच्या दालनात दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या गंभीर मारहाण व हाणामारीच्या घटनेबाबत जालना जिल्ह्याचे खासदार यांनी पोलीस अधीक्षक, जालना यांना निवेदन दिले

महाराष्ट्र दिनानिमित्त माधवबाग खराडी तर्फे मोफत यज्ञ चिकित्सा शिबिर

vishwatmaklokswamivarta

एफसीआरए’ कायद्यातील सुधारणांवर संयुक्त संसदीय समितीची घोषणा-` परकीय निधी नियमन’ कायद्यातील सुधारणा विधेयकावर समितीचे कामकाज  शिवसेना खासदार नरेश म्हस्के `एफसीआरए’ कायद्यातील सुधारणांवरील समितीवर

vishwatmaklokswamivarta