vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना महानगरपालिका कार्यालयातील मा. महापौर यांच्या दालनात दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या गंभीर मारहाण व हाणामारीच्या घटनेबाबत जालना जिल्ह्याचे खासदार यांनी पोलीस अधीक्षक, जालना यांना निवेदन दिले

जालना महानगरपालिका कार्यालयातील मा. महापौर यांच्या दालनात दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या गंभीर मारहाण व हाणामारीच्या घटनेबाबत जालना जिल्ह्याचे खासदार यांनी पोलीस अधीक्षक, जालना यांना निवेदन दिले

राज्य प्रतिनिधी-जालना महानगरपालिका कार्यालयातील मा. महापौर यांच्या दालनात दिनांक 11 मे 2026 रोजी दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या गंभीर मारहाण व हाणामारीच्या घटनेबाबत जालना जिल्ह्याचे खासदार यांनी पोलीस अधीक्षक, जालना यांना निवेदन देऊन कठोर व निष्पक्ष कारवाईची मागणी केली आहे.

सदर घटनेत लोखंडी रॉड, खंजीर यांसारख्या घातक शस्त्रांचा वापर झाल्याची माहिती समोर येत असून, सार्वजनिक व शासकीय कार्यालयात अशा प्रकारचा हिंसाचार घडणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे खासदार डॉ. काळे यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे महानगरपालिका परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रकरणात संबंधित पक्षांकडून परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, भारतीय न्याय संहितेअंतर्गत जिवे मारण्याचा प्रयत्न, घातक शस्त्रांचा वापर, गंभीर दुखापत करणे तसेच सार्वजनिक कार्यालयातील शांतता भंग करणे यांसारखी गंभीर कलमे लावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, घटना घडून जवळपास 12 दिवस उलटूनही आरोपींवर प्रभावी कारवाई झालेली नसल्याबद्दल खासदार डॉ. काळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच, या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये तडजोडीच्या माध्यमातून प्रकरण मागे घेण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येत असून, अशा प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया व पोलीस तपास यांना बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी पोलीस प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत :• सर्व आरोपींवर निष्पक्ष, पारदर्शक व तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.• तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात यावा.• घातक शस्त्रांचा वापर व सार्वजनिक कार्यालयातील हिंसाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी.• कोणत्याही दबावाखाली तपास प्रक्रियेत हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.• भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महानगरपालिका परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात.लोकशाही व्यवस्थेतील सार्वजनिक संस्थांमध्ये अशा प्रकारे हिंसाचार होणे अत्यंत दुर्दैवी असून, कायद्याचा धाक कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ व कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. सदरील निवेदन देण्याचा वेळी महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ.विशाल धानुरे, रघुवीर गुडे, दिनेश सुराणा, शमशोद्दीन शेख, बाबासाहेब सोनवणे, नारायण वाडेकर, सुरज येलगंटीवार, वसीम कादिर, अंकुश शिंदे, भारत लोढा, इतर मान्यवर उपस्थित होते

संबंधित पोस्ट

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी निवडणूक संबंधित नोडल अधिकारी यांची बैठक

vishwatmaklokswamivarta

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजनआवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांचे निर्देश,कालवा सल्लागार समितीची सन 2024-25 (रब्बी व उन्हाळी हंगाम) बैठक

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी यांची कुलभैय्या अनाथालयास भेट देवून पाहणी …

डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण

vishwatmaklokswamivarta