vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी-महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी -काय झालं झोप ना खाली : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिकांना मदत पोहोचविण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच सर्व संबंधित प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही धोका किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

या संकटाच्या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून सर्व यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

 

——–000——-

संबंधित पोस्ट

नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न’ मोहिमेचा समारोप;दर्जेदार रेस्टॉरंट्सचा जिल्हाधिकारी  आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र शासनाचे पाच वर्षे मुदतीचे ८०० कोटी, १३ वर्षे मुदतीचे १६०० कोटी आणि २३ वर्षे मुदतीचे १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारांमध्ये-प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-आसामप्रमाणे संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

vishwatmaklokswamivarta