vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण प्रश्नाची दखल;कास्ट्राईब महासंघातर्फे संविधान प्रत देऊन आभार.

जिल्हाधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण प्रश्नाची दखल;कास्ट्राईब महासंघातर्फे संविधान प्रत देऊन आभार

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या मागणीची सकारात्मक दखल घेत जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना तातडीने पत्र निर्गमित करून जागा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत.         प्रशासनाच्या या गतिमान निर्णयाबद्दल कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

     महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, महासचिव आणि प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार जिल्हा कार्यकारिणीने नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांचा सन्मान करून त्यांना भारतीय संविधानाची प्रत सप्रेम भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान केवळ निवासाच्या जागेचा प्रश्नच नव्हे, तर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या १ ते २२ विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याबाबतचे निवेदनही सादर करण्यात आले.याप्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजीव मोरे, कास्ट्राईब कर्मचारी महसूल जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी आणि संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी काळात प्रलंबित प्रश्नांचीही लवकरच तड लागेल, असा विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

00000000

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

राजकारण हे गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे माध्यमआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे येथे ८ वी युवा संसदआ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

vishwatmaklokswamivarta