vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव

राज्य प्रतिनिधी-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेत मांडलेल्या अशासकीय ठरावावर राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शासकीय ठराव पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त करत हक्कभंगाची सूचना दाखल केल्याचे सांगितलेमागील अधिवेशनात या विषयावरील चर्चेदरम्यान राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभागृहाला केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. याबाबत माहिती घेतली असता काही अधिकाऱ्यांनी प्रतिकूल शेरे नोंदवल्याचे निदर्शनास आल्याचे मुनगंटीवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी अर्पण केले, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत जर प्रशासकीय स्तरावर नकारात्मक भूमिका घेतली जात असेल, तर हा अत्यंत गंभीर विषय आहे. लोकप्रतिनिधींनी सभागृहात मांडलेल्या आणि शासनाने मान्य केलेल्या विषयांवर अधिकारी अडथळे निर्माण करीत असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.”

पुढे ते म्हणाले की, “मंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास हक्कभंग प्रस्ताव मंत्र्यांविरोधात दिला जातो. मात्र अनेकदा विलंब किंवा अडथळे हे प्रशासकीय पातळीवर निर्माण होत असतील, तर भविष्यात अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांविरोधातही हक्कभंगाची कार्यवाही करण्याची प्रथा सुरू करण्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.”

राज्य शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च अधिकाऱ्यांच्या वेतनावर करते. त्यामुळे राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाशी निगडित विषयांमध्ये प्रशासनाने सकारात्मक आणि जबाबदार भूमिका घेणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव केंद्राकडे पाठवण्याचे वचन भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात नमूद असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा विषय आश्वासन समितीकडे पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले. तसेच आश्वासनाच्या पूर्ततेत अनावश्यक दिरंगाई झाल्यास अध्यक्ष म्हणून हक्कभंगाच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणी ही केवळ एका व्यक्तीच्या सन्मानाची नसून भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा गौरव करण्याची बाब असल्याचे सांगत, या संदर्भातील शासनाचे आश्वासन तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

संबंधित पोस्ट

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित..

vishwatmaklokswamivarta

इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी,शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta

कारागृहात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; बंद्यांना बांधली राखी

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबतची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द…

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन