vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बंद कालावधीत औषध पुरवठ्याकरिता अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज

बंद कालावधीत औषध पुरवठ्याकरिता अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज

रायगडअलिबाग, प्रतिनिधी ‘आखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD)’ व ‘महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटना (MSCDA)’ यांनी संपूर्ण भारतभर बुधवार दि.20 मार्च 2026 रोजी एक दिवसासाठी देशातील सर्व ठोक व किरकोळ विक्रेत्यांचा बंद घोषित केला आहे. रायगड जिल्हा औषधी विक्रेता संघटनाही या बंद मध्ये सहभागी होणार असल्याचे या कार्यालयास ज्ञात झाले आहे. या कालावधीत रूग्णांची औषधांसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकारणास्तव बंद कालावधीमध्ये रूग्णांची गैरसोय होऊ नये व त्यांना औषधांचा पुरवठा व्हावा याकरिता सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन (म.रा.) रायगड-पेण यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेवून उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन (म.रा.) रायगड-पेण रा.बा.बनकर यांनी दिली आहे.

०००००००

संबंधित पोस्ट

काँग्रेस तर्फे अतिवृष्टी मुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने तात्काळ मदत करावी या मागणी करिता गांधी चमन येथे धरणे आंदोलन

vishwatmaklokswamivarta

कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य —-जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

शरीर सुदृढ असेल तरच उत्तम प्रशासन घडेल – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ​लोणी – शिर्डी येथे जलसंपदा विभागाच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यासाठी दि.23 व 24 मे 2026 रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा

विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे खरीप २०२५ हंगामातील पीक विमा निश्चितीसंदर्भात मंत्रालयात बैठक

मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह; खाजगी नौकरी इच्छुक उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्ण संधी..