vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यस्तरीय सेपाक टाकरा स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

राज्यस्तरीय सेपाक टाकरा स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – महाराष्ट्र सेपाक टाकरा असोसिएशनच्या वतीने दिनांक 4 ते 7 जुन 2026 दरम्यान नागपुर येथे 36 व्या राज्यस्तरीय सिनीयर व 27 व्या ज्युनीयर सेपाक टाकरा अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता जालना जिल्हा सेपाक टाकरा असोसिएशनच्या वतीने दिनांक 19 मे 2026, मंगळवार रोजी निवड चाचणीचे आयोजन शिशु विहार इंग्लिश स्कुल, जालना येथे सकाळी 10 वाजल्यापासुन करण्यात आलेले आहे.

सदर निवड चाचणीमध्ये सिनीयर गटात सहभागी होणार्‍या खेळाडुंना वयाचे बंधन नाही तर ज्युनीयर गटात सहभागी होण्यासाठी खेळाडुंची जन्म तारीख 01/01/2008 किंवा त्यानंतरची असावी. निवड चाचणीत सहभागी होण्याकरीता कोणतेही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. सदर निवड चाचणीतुन 15 मुले व 15 मुलींची निवड करण्यात येईल व हे खेळाडु राज्यस्तर स्पर्धेत जालना जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करतील. सेपाक टाकरा हा खेळ शालेय स्पर्धांमध्ये सहभागी असुन दहावी व बारावीत असणार्‍या खेळाडुंना गे्रस मार्क तथा शासकीय व निमशासकीय नौकरीसाठी आरक्षणास पात्र आहे.

अधिक माहितीकरीता शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366, जिल्हा प्रशिक्षक अमोल काटकर, उमेश खंदारकर, सुभाष पारे, गणेश लांडगे, नागेश वराडे, सुनील हस्तक, शेख रियाज, गोवर्धन वाहुळ, श्रीमती शेख महेजबीन, श्रीमती सुनीता गवई, श्रीमती गिता संगम, श्रीमती करूणा निरेवाड, अमोल सोलाट यांच्याशी संपर्क साधावा. तरी सदर सुवर्ण संधीचा जालना जिल्हयातील खेळाडुंनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सेपाक टाकरा असोसिएशन जालनाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अश्वीन अंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, देवगिरी विद्या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, जिईएस कॅम्पसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे पा., माजी नगरसेवक जयंत भोसले, बाला परेदसी, ज्ञानेश्वर ढोबळे, क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोढें, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, आशीष जोगदंड, क्रीडा अधिकारी श्रीमती आरती चिल्लारे, कृष्णा जंजाळ, वाहेद पटेल, गुलाब राठेाड, प्रमोद राठोड, डॉ. शेख रफि क, भागवत कडुळे, सचिन मोहीते जालना जिल्हा सेपाक टाकरा असोसिएशन जालना व जालना जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले आहे. 00000

 

संबंधित पोस्ट

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात.

vishwatmaklokswamivarta

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

vishwatmaklokswamivarta

21 ते 23 मार्च दरम्यान वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धानामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना नामी संधी…

विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव 20 मेपर्यंत सादर करण्याचे आवाहन

टेबल टेनिसच्या मैदानात जिल्हाधिकाऱ्यांची फटकेबाजी-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य