vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

01 ऑक्टोंबर, 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम जाहीर

01 ऑक्टोंबर, 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम जाहीर

रायगड-अलिबाग( प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने 01 ऑक्टोंबर 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम जाहिर केला असून हा कार्यक्रम जिल्ह्यात दि.20 जून 2026 पासून सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

या कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे-विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक 01 ऑक्टोबर 2026, तयारी, प्रशिक्षण व छपाई-20 जून, 2026 ते 29 जून 2026, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी- 30 जून, 2026 ते 29 जुलै 2026, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण- 29 जुलै, 2026 पर्यंत, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी- 05 ऑगस्ट, 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी- 05 ऑगस्ट, 2026 ते 04 सप्टेंबर 2026, नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे- 05 ऑगस्ट, 2026 ते 03 ऑक्टोबर, 2026, अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी-07 ऑक्टोबर 2026.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमानुसार प्रथम टप्प्यात 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन प्रत्येक मतदाराला दोन प्रतीत प्रगणना फॉर्म (Enumeration Form) देतील. मतदाराची घरी भेट न झाल्यास त्या ठिकाणी किमान तीन वेळा भेट देणे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) बंधनकारक राहील. मतदारांनी फक्त दिलेला फॉर्म भरुन द्यायचा आहे. मतदारांनी Enumeration Form मध्ये माहिती भरण्यासाठी मागील SIR मतदार याद्यांमधील स्वतःचे व संबंधित नातेवाईकांचे नाव https://voters.eci.gov.in/, येथे तपासावे. अधिक माहितीसाठी संबंधित BLO शी संपर्क साधावा. Enumeration Form मध्ये दिलेली मागील SIR मतदार यादीची माहिती उपलब्ध नसल्यास किंवा डेटाबेसशी जुळत नसल्यास संबंधित मतदारांना ERO कडून नोटीस दिली जाईल. नोटीस प्राप्त झाल्यानंतर मतदारांनी पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करावीत : जर भारतात 01.07.1987 पूर्वी जन्म झाला असेल तर स्वतःच्या जन्मतारीख व/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे. जर भारतात 01.07.1987 ते 02.12.2004 दरम्यान जन्म झाला असेल तर स्वतःच्या जन्मतारीख व/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे. वडील किंवा आई यांची जन्मतारीख व/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे.

जर भारतात 02.12.2004 नंतर जन्म झाला असेल तर स्वतःच्या जन्मतारीख व/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे. वडिलांची जन्मतारीख व/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे. आईची जन्मतारीख व/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे.जर पालकांपैकी कोणताही भारतीय नागरिक नसल्यास, आपल्या जन्मावेळचा त्यांचा वैध पासपोर्ट व व्हिसाची प्रत सादर करावी. जर भारताबाहेर जन्म झाला असेल तरभारतीय दूतावास/मिशन यांनी दिलेला जन्मनोंदणी पुरावा जोडावा. जर भारतीय नागरिकत्व नोंदणी/नैसर्गिकीकरणाद्वारे प्राप्त केले असेल नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

प्रगणना फॉर्म (Enumeration Form) ऑनलाईन सुध्दा भरून देण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या www.voters.eci.gov.in, या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. मतदारांचे फॉर्म त्यांची प्रारुप मतदार यादी दिनांक 05 ऑगस्ट, 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर 05 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर या कालावधीत प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीबाबत काही हरकती व दावे असल्यास दाखल करता येतील. प्रारुप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकती व दावे निकाली काढुन 07 ऑक्टोंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.

तसेच जिल्ह्यात एकूण 2 हजार 790 मतदान केंद्र असून एकूण मतदारांची संख्या 25 लाख 45 हजार 792 इतकी आहे. तर मॅपिंग केलेल्या मतदारांची संख्या 15 लाख 98 हजार 176 इतकी असून त्याची टक्केवारी 62.78 इतकी आहे.

या राष्ट्रीय कार्यक्रमास मतदारांनी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्र्यांनी शिर्डीत घेतला जनता दरबार

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना- गृह राज्य मंत्री योगेश कदम

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले-महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार