vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

1 जून ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी…

1 जून ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी…

रायगड-अलिबाग प्रतिनिधी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी दि.1 जून ते 31 जुलै 2026 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी केले.

   या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छिमार खालील कारवाईस पात्र होतील.

सदर पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि.1 जून 2026 पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि. 31 जुलै 2026 वा त्यापुर्वी सदर नौकांना समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण / मार्गदर्शक सूचना / आदेश लागू राहतील.

    राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास/ केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिध्द आहे.

तरी सर्व मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांनी सदर प्रसिध्दी निवेदनाची नोंद घेवून विहीत बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही. याची दक्षता घ्यावी.

अधिक माहितीकरिता कार्यालयाचा पत्ता अलिबाग कोळीवाडा, बंदररोड, कस्टम हाऊस जवळ, अलिबाग दूरध्वनी क्र.02141-295221.

००००००

संबंधित पोस्ट

महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष निवडणूक तपासणी  मोहिमेत मतदार पडताळणी दरम्यान नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार येथील काही व्यक्ती सापडल्या आहेत.१ ते ३० ऑगस्ट दरम्यान सखोल चौकशी होणार असून, अयोग्य आढळलेल्या नावांना ३० सप्टेंबरला अंतिम यादीतून वगळण्यात येईल.

इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा – औषधनिर्माण क्षेत्रावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सुर्यघर योजनेबाबत रांजणगाव(शें.पू.)येथेशुक्रवारी (दि.२८) ग्रामस्थांची कार्यशाळा..

जम्मू आणि पंजाबमधील पूरपरिस्थितीला भारतीय हवाई दलाने दिला झटपट प्रतिसाद

कोळसा वाहतुकीमुळे पिकांची होणारी नुकसानभरपाई ठरवण्यासाठी समिती गठीत-मंत्री शंभूराज देसाई