vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोळसा वाहतुकीमुळे पिकांची होणारी नुकसानभरपाई ठरवण्यासाठी समिती गठीत-मंत्री शंभूराज देसाई

कोळसा वाहतुकीमुळे पिकांची होणारी नुकसानभरपाई ठरवण्यासाठी समिती गठीत-मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, प्रतिनिधी- कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदानाच्या धोरणासाठी अपर मुख्य सचिव (मुख्यमंत्री सचिवालय) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाच्या तक्रारी लक्षात घेता, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून समिती गठीत करण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.याबाबत सदस्य किशोर जोरगेवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.मंत्री श्री. देसाई म्हणाले, कोळसा वाहतुकीमुळे होणारे पिकाच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने अतिरिक्त मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री सचिवालय यांच्या अध्यक्षतेखाली एक सहा सदस्यांची समिती यवतमाळ जिल्ह्यासाठी गठीत करण्यात आली. याच धर्तीवर चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी समिती गठीत करण्यात येईल. ही समिती तीन महिन्यात या नुकसान भरपाई संदर्भात विभागाला अहवाल सादर करेल या समितीचा अहवाल सादर करताना त्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा देखील विचार करण्यात  येईल.

.000

०००

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ बियाणे, खते शेतकऱ्यांना मुबलक उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करा

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे दशकांपासूनचा विजेचा अडथळा दुरमहावितरण विभागाकडून विविध ठिकाणी नवीन पोल बसवले विजेच्या तारांना सुरक्षित उंची देत बससेवेचा मार्ग मोकळा

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर तिरंगा यात्रेचे आयोजन!

प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- महाज्योतीला 1500 कोटींचा निधी ; इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 63 वसतिगृहे

ठरलं..! व्हॉईस ऑफ मीडियाची जिल्हा बैठक दणक्यात! जिल्हाध्यक्षपदी कृष्णा सपकाळ यांची एकमताने निवड; सुनील मतकर आणि गुलाबराव इंगळे कार्याध्यक्ष….

vishwatmaklokswamivarta