vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नाशिकला अर्थ व सांख्यिकी आयुक्तलयातर्फे 26 पासून प्रशिक्षण कार्यक्रम*

*नाशिकला अर्थ व सांख्यिकी आयुक्तलयातर्फे 26 पासून प्रशिक्षण कार्यक्रम*

*नाशिक, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS)” व ” अन्युअल सर्व्हे ऑफ अनइन्कॉर्पोरेटेड सेक्टर एंटरप्रायझेस (ASUSE)” या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांच्या प्रादेशिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा ‘मित्रा’ येथे मंगळवार 26 मे, 2026 रोजी सकाळी 11.00 वा. होणार आहे.

या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन सोहळ्यास नाशिक विभागास्तरिय प्रमुख अतिथी व अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे विशेष आयुक्त कृष्णा फिरके, अतिरिक्त आयुक्त दिनेश वाघ, इप्सॉस रिसर्च या सर्वेक्षण भागीदार संस्थेचे प्रतिनिधी आणि विविध प्रशासकीय विभागांतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी अचूक सांख्यिकी माहितीचे महत्त्व आहे. तसेच या सर्वेक्षणांद्वारे रोजगार, बेरोजगारी, असंघटित क्षेत्रातील उद्योग, लघु व्यवसाय तसेच आर्थिक क्रियाकल्पांबाबत मिळणारी माहिती शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस अत्यंत उपयुक्त ठरते.

ग्रामीण व शहरी भागांतील प्रत्यक्ष क्षेत्रीय माहिती संकलन करताना पारदर्शकता, अचूकता आणि वेळेचे नियोजन यांचे पालन, सर्वेक्षणामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, प्रत्यक्ष क्षेत्र भेटी आणि गुणवत्तापूर्ण माहिती संकलन यावर प्रशिक्षण असणार आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाची संकल्पना, नमुना निवड पद्धती, मोबाईल आधारित डेटा संकलन प्रणाली, प्रश्नावली हाताळणी, क्षेत्रीय पडताळणी, माहिती गुणवत्तेची खातरजमा तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दोन दिवसांचे वर्गाधारित प्रशिक्षण व त्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रीय प्रशिक्षण अशा स्वरूपात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यभरातील सर्वेक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ही प्रशिक्षण प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यातील विविध विभागांमध्ये अशाच प्रकारचे प्रादेशिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून PLFS व ASUSE सर्वेक्षणांची प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक तयारी करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे राज्यातील सांख्यिकी यंत्रणा अधिक सक्षम होऊन शासनाच्या विकासात्मक धोरणांना अचूक व विश्वसनीय माहितीचा मजबूत आधार प्राप्त होणार आहे.या प्रशिक्षण वर्गास राज्यातील विविध विभागांतील क्षेत्रीय अन्वेषक, पर्यवेक्षक, मास्टर ट्रेनर्स तसेच संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल आज उरणमध्ये**नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे*

vishwatmaklokswamivarta

चिचडोह बॅरेजचे दरवाजे उघडणार ; नागरिकांनी सतर्कता बाळगावी – प्रशासनाचे आवाहन

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची ब्रिटिशकालीन बंकर, ऐतिहासिक वास्तूंना भेट

vishwatmaklokswamivarta