vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसतिगृहांसाठी सैनिकांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू

वसतिगृहांसाठी सैनिकांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू

​अहिल्यानगर, द प्रतिनिधी : जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा व कोपरगाव येथील सैनिकांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, दि. ३० जून २०२६ पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.

​अहिल्यानगर येथे सैनिक मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह नगर कॉलेजसमोर स्थित असून, श्रीगोंदा येथे शासकीय आरोग्य केंद्राशेजारी सैनिक मुलांचे वसतिगृह कार्यरत आहे. तसेच कोपरगाव येथे खंडोबा मंदिराशेजारी सैनिक मुलांचे वसतिगृह सुरू आहेया वसतिगृहांमध्ये अंघोळीसाठी गरम पाणी, स्वतंत्र अभ्यासिका, विविध खेळांचे साहित्य तसेच सुसज्ज मैदान उपलब्ध आहे. वेळोवेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात येते. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहांच्या अधीक्षकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे​या वसतिगृहांमध्ये इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक व सेवेत असलेल्या सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे. युद्धविधवा तसेच दिव्यांग सैनिकांच्या पाल्यांना विनामूल्य प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे

अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. ०१ जुलै २०२६ रोजी प्रवेश निश्चितीसाठी उपस्थित राहावे, असेही कळविण्यात आले आहे.#सैनिकपाल्य #SainikHostel2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar #वसतिगृहप्रवेश #HostelAdmission #माजीसैनिक

संबंधित पोस्ट

एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी  जिल्ह्यातील १५ उपकेंद्रांभोवती प्रतिबंधात्मक आदेश..

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्ये देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर राष्ट्रकुल संसदीय मंडळ विभाग- ७ ची पणजी वार्षिक परिषद

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी 

दक्षिण भारतात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन-पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta