vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, प्रतिनिधी एसटी पार्सल सेवा देणाऱ्या कंत्राटदारांनी माथाडी कायद्याला अनुसरून कामगारांना त्यांचे सर्व कायदेशीर लाभ मिळवून दिले पाहिजेत. तसेच कायद्याप्रमाणे माथाडी कामगारांच्या हिताचे पूर्ण संरक्षण केले जावे, असे स्पष्ट निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

नरिमन भवन येथे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत बैठक पार पडली. बैठकीस कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, उपसचिव स्वप्निल कापडणीस आदी उपस्थित होते. तसेच आमदार सदाभाऊ खोत यांनी दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, मे. ज्युबिलन्ट फूड वर्क प्रा. लिमिटेड या औद्योगिक आस्थापनाने स्थानिक भूमिपूत्र बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली पाहिजे आणि तेथील माथाडी टोळीला तत्काळ मान्यता द्यावी. नवीन माथाडी कामगारांची नोंदणी करण्यासह पडताळणी करावी. या नवीन नोंदणीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनाच पहिले प्राधान्य देण्यात यावे.

माथाडी कामगार आणि कंपन्यांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आपल्या स्तरावर औद्योगिक आस्थापना आणि माथाडी कामगार यांची संयुक्त बैठक आयोजित करावी. या बैठकीत माथाडी कामगारांच्या प्रश्नांचे निरसन करावे, असेही कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथेअभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

vishwatmaklokswamivarta

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

अमरनाथ यात्रेला भक्तांचा जत्था रवाना..

वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, गटकर्ज व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावाया योजनांच्या लाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 7036 झाडांची छाटणी – पावसाळी कालावधीत काळजी घेण्याचे आवाहन