vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चिखलीत निषेधाचा बुलंद आवाज! काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या अश्लाघ्य व बेताल वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप:

चिखलीत निषेधाचा बुलंद आवाज! काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या अश्लाघ्य व बेताल वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप:

राज्य प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीतर्फे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा एकेरी व अत्यंत आक्षेपार्ह, अश्लाघ्य शब्दांत उल्लेख केला. या बेताल व संस्कृतीहीन वक्तव्याचा चिखली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही तीव्र आणि संतप्त निषेध व्यक्त केला.

आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील निषेध आंदोलनात माझ्यासह चिखली भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँग्रेस पक्षाची संस्कृतीहीन मानसिकता आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती जनतेसमोर पुन्हा एकदा उघडी पडली आहे. लोकशाही मूल्यांना काळीमा फासणाऱ्या अशा वक्तव्यांना भारतीय जनता पार्टी कधीही सहन करणार नाही.

सपकाळ यांनी केलेले वक्तव्य हे केवळ दोन व्यक्तींवरील टीका नसून संपूर्ण देशाच्या सन्मानावर केलेला आघात आहे. पंतप्रधानपद हे कोट्यवधी भारतीयांच्या आस्थेचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे. या पदाची गरिमा न राखता केलेले अशोभनीय वक्तव्य म्हणजे देशातील जनतेच्या भावनांचा थेट अपमान आहे. सपकाळ यांच्या या वक्तव्यातून काँग्रेस पक्षाची विकृत मानसिकता, संस्कृतीहीन राजकारण आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा जनतेसमोर उघडी पडली आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणी तत्काळ जाहीर माफी मागावी आणि सपकाळ यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

महाविकास आघाडीला शेतकऱ्यांची खरोखरच काळजी असती तर सत्तेत असताना कांदा उत्पादकांसाठी ठोस धोरणे राबवली असती. मात्र सत्ता गेल्यानंतर केवळ राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांना हाताशी धरून असे संस्कृतीहीन राजकारण करणे हे दुटप्पीपणाचे लक्षण आहे, असेही या वेळी स्पष्ट केले.या आंदोलनात भाजपाचे सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्राचा सन्मान, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि जनतेच्या भावना यांचे रक्षण करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा एकमुखाने धिक्कार केला.

0000

संबंधित पोस्ट

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना प्रजागर्क पदवी

vishwatmaklokswamivarta

५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती करणारा बीड जिल्हा राज्यात प्रथम!महाराष्ट्राला घरकुलांचे अधिकचे उद्दीष्ट मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची कुडाळ तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट महसूल कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना आचारसंहिता नियमांचे पालन करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लंबित प्रस्तावांना8 डिसेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्या- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पायाभूत सुविधांच्या कामांकरिता युनिक आय डी क्रमांक मिळवण्यासाठी तातडीने कार्यवाही करा.

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’स्थापन करा-राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक