vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी

पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी

 

गडचिरोली, द प्रतिनिधी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येत्या 28 जून 2026 रोजी जिल्हाभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत पोलिओ मोहिमेच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मोहिमेदरम्यान महावितरण, एस.टी. महामंडळ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग तसेच अन्य संबंधित विभागांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. प्रवासात असणाऱ्या बालकांसाठी बस स्थानकांवर ट्रान्झिट बूथ उभारणे, अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करणे, अंगणवाडी व शाळा स्तरावर जनजागृती करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

विटभट्ट्या, बांधकाम स्थळे, दुर्गम पाडे तसेच स्थलांतरित वस्त्या यांसारख्या जोखीमग्रस्त भागांमध्ये विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्येही लसीकरण शंभर टक्के पूर्ण होईल, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

28 जून रोजी पोलिओ बूथवर बालकांना पोलिओ डोस दिल्यानंतर ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आणि शहरी भागात पुढील पाच दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन सुटलेल्या बालकांचा शोध घेण्यात येणार असून, त्यांनाही पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोटुळे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘दोन थेंब पोलिओचे, आरोग्याच्या सुरक्षेचे’ या ब्रीदवाक्यानुसार जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना 28 जून रोजी जवळच्या पोलिओ बूथवर नेऊन पोलिओची लस पाजावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.#गडचिरोली #Gadchiroli #maharashtra #PolioDrops #PulsPolio

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम; जिल्ह्यात ४२ पथकांमार्फत होणार तपासणी

जिल्हा रुग्णालयाकडून ५५ मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

जिल्हा आयुष रुग्णालयात वृक्षारोपण उत्साहातऔषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड ; वृक्षसंवर्धनाचा संदेश..

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय” प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर· ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा 1 मार्च रोजी शुभारंभ

ठाणे जिल्ह्यात ‘अतिसार थांबवा’ मोहीम १६ जून ते ३१ जुलै दरम्यान राबविण्यात येणार