vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी,ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जून पर्यंत मुदत

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी,ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जून पर्यंत मुदत

नांदेड द प्रतिनिधी:- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि तंत्र विद्यालय नांदेड येथील कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 साठी ऑनलाईन पद्धतीने येथे अर्ज भरण्यास बुधवार 20 मे 2026 रोजी सुरुवात झाली आहे. सदर अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन http://vnmkv.agridiplomaadmission.ac.in येथे अर्ज दाखल करण्याचा अंतिम बुधवार 10 जून 2026 पर्यंत आहे.

राज्य शासनाने 18 मे 1972 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्थापना परभणी येथे केली छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली व लातूर या आठ जिल्ह्यांचा या विद्यापीठांतर्गत समावेश होतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा मुख्यालय परिसर परभणी येथे असून विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि विस्तार हे तीन अंतर्भूत विभाग आहेत. निम्नस्तर कृषि शिक्षण ही त्यातील विद्या शाखा असून या शाखेच्या अधिपत्याखालील 5 घटक (शासकीय) अनुदानित, 1 घटक (शासकीय) विनाअनुदानित तसेच 51 खाजगी विनाअनुदानित कृषि तंत्र विद्यालये कार्यरत आहेत. कृषि तंत्र विद्यालय नांदेडची स्थापना 15 ऑक्टोबर 1963 ची असून हे कृषि तंत्र विद्यालय नावाजलेले व उच्च दर्जाचे तंत्र विद्यालय आहे.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रत्यक्ष शेती उत्पादित मालातून व शेती व शेतीपूरक असणाऱ्या व्यवसायाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते तसेच कृषि व पूरक व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नियमितपणे रोजगार निर्मिती होते. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा भागवण्यासाठी, शेती विषयांच्या आकांक्षा फलद्रूप करण्यासाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मनुष्यबळाची निर्मितीचे काम कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केली जात आहे.

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाच्या संकल्पनेनुसार युवक-युवतींना कृषि व्यवस्थापना बरोबर दैनंदिन जीवनाला कसे सामोरे जावे हे शिकविले जाते. पीक संवर्धन, पीक संरक्षण, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, फळे व भाजीपाला उत्पादन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग, पणन व विपणन व त्याचबरोबर प्रात्यक्षिकाद्वारे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते. या सगळ्या मार्गदर्शनामुळे विविध कृषि कार्याची आखणी कशी करावी ? कमी कालावधीत योग्य ती कृती करून केलेल्या कामाची उद्दिष्ट कशी साध्य करावीत ? अशा सगळ्या आखणीचा परिणाम काय होतो ? हे सगळे अनुभव हे विद्यार्थी या शिक्षणातून घेतात या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून योग्य उत्पादन निर्माण करून विक्रीपर्यंतचे सगळे प्रगत तंत्रज्ञान शिकविले जाते आणि त्यामुळे आधुनिक पद्धतीने कृषि क्षेत्रात पारंगतता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाचे मुख्य उद्देश :

शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना कृषि व तत्सम विषयांचे प्रात्यक्षिकाभिमुख शिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, ज्यामुळे विद्यार्थी स्वतःची शेती करण्यात प्रवृत्त होऊन सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कृषि उत्पादन वाढेल.

कृषि तंत्र पदविकाधारक कृषि पूरक स्वयंरोजगाराभिमुख उद्योगाद्वारे स्वतःच्या रोजगाराची निर्मिती करून स्वावलंबी होता येईल व त्याद्वारे इतरांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कृषि पदविका धारकास कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, कालवा निरीक्षक आणि शालेय शिक्षणामध्ये कृषि विषयाचा समावेश झाल्यास कृषि शिक्षक म्हणून शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात सेवा करता येईल. कृषि सेवा केंद्र (खते व बि-बियाणे परवानाधारक). स्वयंम कृषि सल्ला व मार्गदर्शन केंद्र.

नांदेड कृषि तंत्र विद्यालयाची वैशिष्ट्ये :उच्च शिक्षित कर्मचारी वृंद. सुसज्ज परिसर व सुसज्ज् व्याख्यानगृहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. प्रशस्त इमारत व भव्य क्रीडांगण. नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यालय नांदेड मधील विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय व संशोधन केंद्र सलग्नतेचा विद्यार्थ्यांना विशेष लाभ, अशी माहिती नांदेडचे कृषि तंत्र विद्यालायाचे प्राचार्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

संबंधित पोस्ट

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/ सैनिक विधवा यांना आवाहन…

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी..

vishwatmaklokswamivarta

आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनाही राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिन सोहळयाचं निमंत्रण. 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे –प्रधान सचिव श्रीकर परदेशी*‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज** वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन*