vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आयआयएमसी’ची एमए आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; ई-समुपदेशनासाठी नोंदणीची अंतिम तारीख 7 जून 2026 तीन नवीन विशेष एमए अभ्यासक्रमांमुळे आयआयएमसीच्या सहा शैक्षणिक परिसरांमधील अभ्यासक्रमांमध्ये वाढ

आयआयएमसी’ची एमए आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; ई-समुपदेशनासाठी नोंदणीची अंतिम तारीख 7 जून 2026


तीन नवीन विशेष एमए अभ्यासक्रमांमुळे आयआयएमसीच्या सहा शैक्षणिक परिसरांमधील अभ्यासक्रमांमध्ये वाढ

नवी दिल्ली प्रतिनिधी

देशातील प्रतिष्ठेच्या माध्यम शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ (आयआयएमसी) मधील एमएच्या सहा आणि पदव्युत्तर पदविकेच्या चार अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ई-समुपदेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. एमए आणि पदव्युत्तर पदविकेच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये केवळ ई-समुपदेशन प्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी https://iimc.admissions.nic.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. ई-समुपदेशनासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 7 जून 2026 आहे. पहिली प्रवेश यादी 9 जून रोजी जाहीर करण्यात येईल.

यंदा आयआयएमसीने 3 नवीन एमए अभ्यासक्रम सुरू केले आहेत. एमए इन हेल्थ कम्युनिकेशन, एमए इन मिडिया ॲण्ड कम्युनिकेशन गव्हर्नन्स आणि एमए इन कॉर्पोरेट कम्युनिकेशन ॲण्ड ब्रॅण्ड मॅनेजमेंट असे तीन अभ्यासक्रम आहेत.

आयआयएमसीने आता आपल्या नवी दिल्ली, धेनकनाल, ऐझवाल, अमरावती, जम्मू आणि कोट्टायम अशा सहा शैक्षणिक परिसरांमध्‍ये नवीन सहा एमए अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत, असे प्रवेश प्रभारी आणि परीक्षा नियंत्रक प्रा. डॉ. राकेश कुमार गोस्वामी यांनी सांगितले.

आयआयएमसीचे पदव्युत्तर पदविकेचे चार परंपरागत अभ्यासक्रमही यंदा उपलब्ध आहेत. यामध्ये इंग्रजी, हिंदी, रेडिओ व दूरचित्रवाणी पत्रकारिता याबरोबर जाहिरात आणि जनसंपर्क या विषयांतील अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

किमान 55% गुणांसह पदवीधर झालेले आणि मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझ्म (सीओक्यूपी17) या विषयातील सीयूईटी-पीजीचे वैध गुण असलेले भारतीय नागरिक एमए अभ्यासक्रमांसाठी पात्र आहेत. तसेच, याच विषयात सीयूईटी-पीजीचे वैध गुण असलेले पदवीधर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी पात्र आहेत.

पदव्युत्तर पदविका प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1 ऑगस्ट 2026 रोजी 25 वर्षे, इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 28 वर्षे आणि अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती/दिव्यांग उमेदवारांसाठी 30 वर्षे आहे.प्रवेश यादीत नाव आलेल्या उमेदवारांनी त्यांना जागा मिळालेल्या अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित करण्यासाठी , जागा स्वीकृती शुल्क म्हणून 20,000 रूपये भरणे गरजेचे आहे. त्यानंतर उर्वरित शिक्षण शुल्क प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निर्धारित कालावधीत जमा करणे आवश्यक आहे.

संबंधित पोस्ट

स्मार्ट’अंगणवाडीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यांत ‘डिजिटल शेतीशाळा’ 1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन· सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा !**शेवटचा बांगलादेशी भारताबाहेर जाईपर्यंत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आंदोलन चालू राहणार !* 

vishwatmaklokswamivarta

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta