vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी..

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी..

 

नांदेड प्रतिनिधी :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक-युवतीसाठी १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत CDS कोर्स क्र. 67 आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी १४ जून २०२६ सकाळी १० वा. प्रशिक्षण केंद्रात उपस्थित रहावे

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. नांदेड जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा संनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे 7 जून 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare Pune यांच्या वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन DSW Portel (Resources – PCTC Nshik-CDS-६७) किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या, प्रवेशपत्र, त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सदर सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. (CDS) या परीक्षेसाठी आनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा ई-मेल आयडी training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

बीड जिल्ह्यातील  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल –

लखपती दिदी’ अभियानाला गती; महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात MY Bharat पोर्टल नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…

इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन