vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण..

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण..

 

अमरावती, प्रतिनिधी: सिंदेवाही परिक्षेत्र (ब्रह्मपुरी प्रादेशिक वनविभाग) येथील ‘T२’ नामांकित वाघिणीच्या शावकासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारी आहे. या चुकीच्या बातम्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे आणि वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गैरसमजाचे वातावरण निर्माण होत असल्याचे वन विभागाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबतची खरी वस्तुस्थिती अशी की, सिंदेवाही परिक्षेत्रातील ‘T२’ वाघीण मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण करत असल्यामुळे, वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून तिला तिच्या शावकांसह सुरक्षितपणे पकडले आहे. मात्र, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याप्रमाणे ‘T२’ वाघिणीला परतवाडा येथे हलवलेले नसून, तिच्या शावकांपैकी एका शावकाला (T२ Cub १) पुढील आवश्यक व्यवस्थापन, सुरक्षितता आणि वैद्यकीय देखरेखीच्या दृष्टीने परतवाडा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

या शावकाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार असल्याच्या अफवा देखील पसरत आहेत, परंतु सद्यस्थितीत या ‘T२ Cub १’ शावकास मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्याचा किंवा मुक्त अधिवासात पुनर्स्थापित करण्याचा कोणताही निर्णय अथवा योजना वन विभागाच्या विचाराधीन नाही. शावकाला केवळ सुरक्षित वातावरणात वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक निगा उपलब्ध करून देणे हाच या स्थलांतराचा प्रमुख उद्देश आहे. प्रसारमाध्यमांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही यासाठी वस्तुस्थितीवर आधारित आणि वन विभागाकडून पडताळणी केलेली अचूक माहिती प्रसारित करावी, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच #पीएमविश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन

आमदार संजय खोडके, सुलभा खोडके यांची कौशल्य विकास कार्यालयाला भेट

मान्सून कालावधीत यंत्रणांनी सज्ज राहावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*कृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त नवी मुंबई खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल    -जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

जळगाव जामोद नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे गणेश दांडगे विजयी भाजपचे ९, काँग्रेसचे ५ सदस्य

vishwatmaklokswamivarta