vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली,राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली,राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

राज्य प्रतिनिधी -ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “अनंतराव थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी ग्रामीण विकास, शेती, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्य केले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी लोकसंग्रह, साधेपणा आणि जनसेवा ही मूल्ये जपली.

ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे व्यक्तिमत्त्व हे संयमी, सर्वसमावेशक आणि लोकहिताला प्राधान्य देणारे होते. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांनी जपलेले स्नेहसंबंध आणि राजकारणातील सभ्य परंपरा कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने केवळ भोर तालुक्याचेच नव्हे, तर पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. थोपटे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना करते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रमांतर्गत तीर्थक्षेत्रातील सेवांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नाशिक कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी हजारो तरुण राहणार कार्यरत…

vishwatmaklokswamivarta

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार   

नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पैठणला १००, पाचोडला ५० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला नवी बळकटी

vishwatmaklokswamivarta

महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन