vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षेचे गुणपत्रक,प्रमाणपत्र परीक्षार्थीने हस्तगत करण्याचे आवाहन

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षेचे गुणपत्रक,प्रमाणपत्र परीक्षार्थीने हस्तगत करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था ,पुणे यांच्यामार्फत दिनांक २३, २४ व २५ मे २०२५ रोजी जी.डी.सी.आणि सी.एच.एम. परीक्षा २०२५ देवगिरी महाविद्यालय येथे ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.

परीक्षार्थींनी आपली गुणपत्रके व प्रमाणपत्रे दिनांक ३० जून २०२६ पर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर कार्यालयात स्वतः समक्ष हजर राहून हस्तगत करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे

यासोबतच, ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२२, २०२३ व २०२४ मधील परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र अद्याप कार्यालयात येऊन नेलेले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी देखील तात्काळ कार्यालयात समक्ष येऊन आपली प्रमाणपत्रे हस्तगत करावीत, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

डिजिटल शेती शाळेत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी 

vishwatmaklokswamivarta

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मतदार यादीत नाव कायम राहण्यासाठी एसआयआर कार्यक्रमांतर्गत मॅपींग करून घेणे अनिवार्य**मतदार याद्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन*