vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नियमांचे काटेकोर पालन व्हावे– राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे,पातूर येथे मतदान केंद्रे व स्ट्रॉंगरूमची पाहणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नियमांचे काटेकोर पालन व्हावे– राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे,पातूर येथे मतदान केंद्रे व स्ट्रॉंगरूमची पाहणी

अकोला, प्रतिनिधी : पातूर नगरपरिषद तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण निवडणूक यंत्रणा सक्षम, सज्ज आणि सतर्क ठेवावी. प्रत्येक नियमाचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक तयारी व आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा त्यांनी घेतला. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, न. प. प्रशासन सहआयुक्त विश्वनाथ वडजे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पातूर व अकोट नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान केंद्रांची तयारी, मनुष्यबळाचे नियोजन, तसेच आवश्यक साधनसामग्री यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी ग्रामपंचायत व इतर निवडणुकांसाठी आरक्षण सोडत, प्रशिक्षण प्रक्रिया आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, आयुक्तांनी पातूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन मतदान केंद्रे व स्ट्रॉंगरूमची पाहणी केली. न. प. मराठी शाळा क्र. १ येथील मतदान केंद्राला त्यांनी दिली. पातूर येथे त्यांनी मतदान कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व निवडणूक प्रक्रियेतील बारकावे समजावून सांगितले.

निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडता कामा नये. आचारसंहितेचे काटेकोर पालन करून निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडाव्यात, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले.

०००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन..

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा,कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहननवी मुंबईत ‘कॅम्पस कनेक्ट’ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. 

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी राज्यात विशेष  मोहीम

vishwatmaklokswamivarta

🔥 पानिपतची तिसरी लढाई (१७६१)

vishwatmaklokswamivarta