vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिराचे’ आयोजन कर्मचारी समाधान शिबिरासाठी माहिती तात्काळ सादर करा -जिल्हाधिकारी 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिराचे’ आयोजन कर्मचारी समाधान शिबिरासाठी माहिती तात्काळ सादर करा -जिल्हाधिकारी

 

नांदेड, प्रतिनिधी- शासन सेवेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी तातडीने आणि कार्यक्षमतेने सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबीर’ आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व विभाग प्रमुखांनी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अर्जाची माहिती कर्मचारी समाधान शिबीर विविरणपत्र अ व ब तात्काळ भरुन सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, विविध विभागाचे प्रमुख व प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावरील अडचणी जिल्हाधिकारी कार्यालयातील तर तालुका स्तरावरील अडचणी हया तहसिल कार्यालयातील आणि विभागीय पातळीवरील अडचणी हया विभागीय आयुक्त कार्यालयातील शिबीरात स्विकारण्यात येणार आहे. अर्जदार अधिकारी / कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी यांना शिबीरास उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

अनेकदा कर्मचाऱ्यांना वेतन, पदोन्नती, रजा, निवृत्तीवेतन किंवा सेवापुस्तिका अद्यावत करणे यांसारख्या वैयक्तिक कामांसाठी प्रशासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर या शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. जर पहिल्या शुक्रवारी सुट्टी असेल, तर त्यापुर्वीच्या कामकाजाच्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यालयामध्ये कर्मचारी यांची सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांची यादी अद्यावत करून तीचा त्या त्या शिबिरात समावेश करण्यात येणार आहे.

या मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण होऊन प्रशासकीय कामात गती येईल. सर्व संबंधित विभाग प्रमुखांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली.

00000

संबंधित पोस्ट

मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात अनधिकृतरित्या उभारलेल्या तात्पुरत्या संरचना, बांधकाम, टर्फ निष्कासित करण्याची कारवाई सुरू*

बिहारच्या नव्याने शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

एपीएमसी मार्केटजवळील चेक पोस्टवर आचारसंहिता पथकाने पकडली 16 लाख 16 हजार रोकड

vishwatmaklokswamivarta

लखपती दिदी’ अभियानाला गती; महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश..

स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 करिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज**सर्वेक्षणाच्या टुलकीटनुसार करावयाच्या कार्यवाहीचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सविस्तर आढावा*

vishwatmaklokswamivarta