vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांचे निधन**मुकुंद नगर धारावी ते सायन स्मशानभूमी पर्यंत अंत्ययात्रेत शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती

*रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांचे निधन**मुकुंद नगर धारावी ते सायन स्मशानभूमी पर्यंत अंत्ययात्रेत शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती

मुंबई प्रतिनिधी – रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांचे काल रात्री रविवार दिनांक 7 जून रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले.दिवंगत मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा आज सोमवार दिनांक 8 जून रोजी दुपारी ३ वाजता नालंदा सोसायटी मुकुंद नगर धारावी येथील राहत्या घरापासून निघून सायन स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दिवंगत मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांना देशभरातील लाखो रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. येत्या दिनांक 15 जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दिवंगत मातोश्री जनाबाई जनाबाई देवराम कासारे यांची जाहीर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री दिवंगत जनाबाई देवाना कासारे यांच्या अंत्ययात्रेत भदंत शांतीरत्न; रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे अक्षय आंबेडकर माजी आमदार बाबुराव माने;बाळासाहेब गरुड ; अशाताई लांडगे; भास्कर वाघमारे; तानसेन ननावरे; मिलिंद सुर्वे; सागर संसारे; रमेश जाधव; श्रीकांत भालेराव; सोहेल शेख; जीवन जाधव; आली चौधरी; भगवान धनराज; गंगावणे; अमित तांबे; भीमराव सावतकर; मारीभाई ; आदी अनेक मान्यवर नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

36104 नवी मुंबईकर विद्यार्थ्यांनी घेतला सन 2024-25 वर्षात शिष्यवृत्तीचा लाभ..           

राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचा समारोप; शालेय शिक्षणमंत्री दोन्ही दिवस उपस्थित शालेय शिक्षण दर्जेदार पद्धतीने देण्यासह विविध विषयांवर महत्त्वपूर्व चर्चा

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा शाळेतील माजी विद्यार्थिनी पश्चिम विभागाची कर्णधार फुटबॉलपटू राबिया शेख यांचा आयुक्तांनी केला विशेष सत्कार…

vishwatmaklokswamivarta

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.25 जानेवारी 2025 रोजी15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण..ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…