vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीवर आता कडक निर्बंध परवानाधारक औषधविक्रेत्यांकडूनच विक्री अनिवार्य, केंद्र सरकारचा निर्णय

लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीवर आता कडक निर्बंध परवानाधारक औषधविक्रेत्यांकडूनच विक्री अनिवार्य, केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली, प्रतिनिधी: केंद्र सरकारने देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषधे नियम,1945 मध्ये सुधारणा करून हा निर्णय लागू केला आहे.

आरोग्य मंत्रालयाने 29 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अनुसूची ‘के’ मधील नोंद क्रमांक 13(7) मध्ये बदल करण्यात आला असून, त्यातून ‘सिरप’ हा शब्द वगळण्यात आला आहे. यापूर्वी 1,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये परवानाधारक औषधविक्रेता उपलब्ध नसल्यास काही अटींवर कफ सिरप विक्रीस सवलत होती. नव्या सुधारणेमुळे ही सवलत रद्द करण्यात आली आहे.

त्यामुळे आता देशातील सर्व गावांमध्ये कफ सिरपची विक्री आणि वितरण औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 तसेच संबंधित नियमांचे पालन करूनच करावे लागणार आहे. यासाठी परवानाधारक औषधविक्रेत्यामार्फतच औषधांची विक्री करणे बंधनकारक राहील.

कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच औषध उत्पादक, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांनी संबंधित कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत.

संबंधित पोस्ट

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५,४६,०१० अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा..

vishwatmaklokswamivarta

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन : ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाऊंडेशन (#सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार

चांडोळ येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण संपन्न; ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार

एमआरआय, कॅथलॅब, डायलिसिस सेंटर, पशुवैद्यकिय रुग्णालय व इतर आरोग्य सुविधांचे नवी मुंबईत लोकार्पण