vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज ‘ड्राय डे’; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज ‘ड्राय डे’; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

 

      अमरावती, प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदेश जारी केले असून, त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात ‘कोरडा दिवस’ पाळण्यात येणार आहे.या आदेशानुसार, उद्या गुरुवार, 18 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजेच मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमरावती जिल्ह्यातील सर्व ठोक आणि किरकोळ मद्यविक्रीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    पूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशांमध्ये अंशतः बदल करून प्रशासनाने हा सुधारित निर्णय घेतला आहे. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची काटेकोरपणे नोंद घ्यावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा अंमलबजावणीत कुचराई करणाऱ्या मद्यविक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र दारूबंदी कायद्या’न्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ ‘पल्स वैद्यकीय परिषद’ २७ व २८ मार्च रोजी

राजेगाव येथील शेतकरी उगले यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठींबा…

राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार; देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले! मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत ३०० हून अधिक निवेदने धडकली

vishwatmaklokswamivarta

जम्मू आणि पंजाबमधील पूरपरिस्थितीला भारतीय हवाई दलाने दिला झटपट प्रतिसाद

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन…

vishwatmaklokswamivarta