vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी विशेष पथक स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी विशेष पथक स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुंबई प्रतिनिधी- राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी विशेष पथक स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या पथकासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांना विशेष प्रोत्साहनपर लाभ दिले जातील. तसंच या विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार पुढील नियुक्ती तसंच अमली पदार्थांविषयी माहिती देणाऱ्यांना पारितोषिक देण्याचाही सरकारचा विचार आहे.

याशिवाय, एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अमली पदार्थ जप्त होत असल्यास संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

राज्यात अमली पदार्थांविरोधात व्यापक कारवाई सुरू असून, ड्रग तस्करीचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांबरोबरच त्यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

याच मोहिमेअंतर्गत परदेशात लपून बसलेला ड्रग तस्कर सलीम डोला याला भारतात आणण्यात यश आले आहे.तपासादरम्यान त्याने देशभरात पसरविलेल्या सुमारे ४,००० किलो एमडी (MD) ड्रग्जपैकी मोठा साठा जप्त करण्यात आल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू रस्त्या’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये रंगणार हुरडा पार्टी व संक्रांत महोत्सव

स्वच्छता जनजागृती मोहीम — राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन 

पालकमंत्री आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

शिर्डी औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारास प्राधान्य – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत शिर्डी एमआयडीसीत ३ हजार स्थानिक युवकांना रोजगार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta