vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

 

 नवी मुंबई प्रतिनिधी   – महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 जाहीर करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे मतदारांच्या मतदारांना घरोघरी भेट देणार आहेत. सदर प्रक्रिया दि. 30 जून ते 29जुलै 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

          या गृहभेटीमध्ये 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदार संघातील मतदारांना गणना पत्र (Enumeration Form) वाटप करण्यात येणार आहे. ज्या मतदारांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत आहे, त्यांनी त्यांच्या स्वतःशी व त्यांच्या मतदार पाल्यांशी मॅपींग करणे कामी गणनापत्रात माहिती भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे परत करावयाची आहे.

          सदर गणनापत्र कुटुंबातील सर्व मतदारांसाठी एक सज्ञान व्यक्तीही स्वीकारू शकतात व भरून स्वाक्षरीत करू शकतात. ज्या मतदारांचे नाव सन 2002, 2003, 2004 मधील मतदार यादीशी मॅचिंग होऊ शकत नाही, त्यांनाही गणना पत्र भरून देण्याची मुभा आहे. ज्या मतदारांचे गणना पत्र भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्राप्त होतील, त्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होणार आहेत.

          हे काम नियोजनबध्द रितीने व काटेकोटरपणे व्हावे यादृष्टीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रशिक्षण विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण सत्रात अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी मार्गदर्शन केले. गणनापत्र घेऊन आपल्या घरी येणा-या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावेव गणनापत्रात योग्य माहिती भरून ते त्यांच्याकडेच परत द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

          यावेळी 150 ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी श्रीम. प्रिती पाटील व 151 बेलापूर विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी श्रीम. अश्विनी पाटील यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्रीम.साधना पाटील, श्रीम.अनुराधा बाबर, श्री.वसंत मुडांवरे, श्री.सुखदेव येडवे, श्री.भरत धांडे उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे सुरेखा शिंदे पुन्हा स्वत:च्या पायावर उभ्या झाल्याआ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशील कृतीने मुलीच्या डोळ्यात आले पाणीआई पुन्हा चालू लागली… हे केवळ वैद्यकीय यश नाही, तर सुधीरभाऊंसारख्या संवेदनशील नेतृत्वामुळे शक्य

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तसेच रस्त्यावरील वाढती गर्दी लक्षात घेता वाहनचालकांची काटेकोर तपासणी…

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा

चेंबूर पेट्रोल पंप कुर्ला स्टेशन मार्गावरून नेहरूनगर डेपो अशी सेवा सुरू करण्याची मागणी-धारावीकरांना चेंबूर मध्ये जाण्यासाठी बस सेवेची अडचण-

मनोरा आमदार निवाससाठी ५५.५० कोटींच्या विकास शुल्कासह वाढीव खर्चाला मंजुरी फेब्रुवारी २०२८ पर्यंत भव्य आणि सुसज्ज ४२ मजली इमारत; मिनी थिएटर, जिम आणि आधुनिक सुविधांचा समावेश

ठाणे जिल्ह्यातील निर्यात प्रोत्साहनासाठी आयोजित,महाराष्ट्र निर्यात संमेलन 2024-25 संपन्न