vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची आढावा बैठक

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन-नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची आढावा बैठक

मुंबई, प्रतिनिधी : नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने सर्व सुविधा नियोजनबद्ध, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, भूमी अभिलेख उपसंचालक, निफाड व नाशिकचे उपविभागीय दंडाधिकारी, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे भव्य प्रतीक आहे. देशभरातून तसेच जगभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना उत्तम सुविधा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. यावेळी नाशिक चक्राकार रस्ता, त्र्यंबक डीपी रोड, त्र्यंबक दर्शन पथ, द्वारका सर्कल परिसराचा विकास, ओझर विमानतळाशी संबंधित सुविधा, घोटीवाले रोड, कर्मचारी वसाहत, घाट बांधकाम तसेच विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन, जमीन मोजणी आदी कामांचा सविस्तर आढावा मंत्री महाजन यांनी घेतला.

कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था आणि सुरक्षितता यांचा विचार करून सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी करावी. कामे वेळेत पूर्ण होणे जितके आवश्यक आहे, तितकेच ती दर्जेदार आणि टिकाऊ असणेही महत्त्वाचे आहे.

कुंभमेळ्याच्या भव्यदिव्य आयोजनासाठी सर्व विभागानी आपआपसात समन्वय ठेवून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.

०००

संबंधित पोस्ट

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न**साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प**- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

भारतातील प्रवास सेवा अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्टची सुविधा सुरू

vishwatmaklokswamivarta

शाहिरांचा पोवड्याने दुमदूमली सातारा राजधानी! सातारा येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते शाहिरी महोत्सवाचे थाटात उदघाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट दावोस गुंतवणूक करार, उद्योग संधीसाठी केले अभिनंदन…

vishwatmaklokswamivarta

टाकाऊ वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रातून कापडी कच-याच्या समस्येचे निराकरण तसेच महिलांचे सक्षमीकरण…