vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जलजीवन मिशन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

जलजीवन मिशन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई, प्रतिनिधी–जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेतंर्गत सुरू असलेली येवला तालुक्यातील राजापूर सह ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगांव सह १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, लासलगाव विंचूर सह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या पाणीपुरवठा योजनांची उर्वरित कामे तातडीने पूर्णत्वास नेण्याचे निर्दैश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिले.

मंत्रालयात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या आढावा बैठकीत मंत्री भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले. या बैठकीस आमदार पंकज भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र ग लोणारी, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर,कृषी उत्पन्न बाजार समिती येवलाचे सभापती वसंत पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर, अधिक्षक अभियंता सुबोध मोरे, कार्यकारी अभियंता स्नेहांकुश चिकोडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.व्ही.महाजन, स्थानिक पदाधिकारी मोहन शेलार,ज्ञानेश्वर दराडे, भगवान ठोंबरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, जलजीवन मिशन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत सुरू असलेली कामे विहित मुदतीत पूर्ण होतील याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी. कामांना विलंब करत असलेल्या कंत्राटदारांकडून नियमानुसार दंड वसूल करावा.तसेच मंजूर कामांसाठीचा निधी तत्परतेने मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही सर्व संबंधितांनी गतीने करावी. त्याचप्रमाणे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील जल जीवन मिशन अंतर्गतची कामे ही तातडीने पूर्ण करण्यात यावी,असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले

००००

संबंधित पोस्ट

खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीचे ‘महा-मॉकड्रिल’ यशस्वीजिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेची मोठी चाचणी विविध यंत्रणांचा उत्स्फूर्त सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमपीएससीत,मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी*जीम, स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना…

बांधकाम साईट्सवरील वायू प्रदूषण टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष तपासणी….

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत “कृषिदिन व शेतकरी सत्कार समारंभ” उत्साहात संपन्न

रेशीम उत्पादनाच्या ‘जालनाई ब्रँड ‘चा जालन्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभसिल्क, सीड आणि स्टीलची सिटी म्हणून आता जालना जिल्हा ओळखला जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जालन्यातील रेशीम बाजारपेठेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार उदघाटन