vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग बांधवानी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग बांधवानी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी: सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन (Most Outstanding Person with Disabilities), श्रेष्ठ दिव्यांगजन (Outstanding Person with Disabilities) व श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बाल/बालिका (Outstanding Creative Divyang Child) या राष्ट्रीय पुरस्कार ३१ जुलै २०२६ पर्यंत www.depwd.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

अर्ज केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.नामांकनामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात नमूद केल्याप्रमाणे सर्व संबंधित तपशील असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरी माहितीच्या (वर्णनात्मक) स्वरूपात स्पष्टपणे अधोरेखित केलेली असावी. कामगिरीशी संबंधित सहाय्यक कागदपत्रे देखील पोर्टलवर अपलोड करावीत

       पात्रतेचे निकष आणि इतर तपशिलांसाठी, विभागाच्या संकेतस्थळावर (www.depwd.gov.in) आणि राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (www.awards.gov.in) उपलब्ध असलेल्या ‘दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा’ संदर्भ घ्यावा, असे जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

प्रहारची ‘धार’ अन् प्रशासनाची झाली ‘हार’!धाड येथील आठवडी बाजारासाठी महामार्गावरच थाटली दुकाने; भरचौकात ठोकला उपोषण मंडप

मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या कारवाई सुरूच

बी.ई.जी. मधून सेवानिवृत्त सैनिकांसाठी कोल्हापूर येथे 20 जुलैला संपर्क अभियान

गटाशिक्षण आधिकारी पंस. चिखली श्री रमेश रतन डुकरे पाटिल यांना व त्यांना वाचविण्याऱ्या दोषी आधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई कराआमदार प्रशांत बंब

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!