vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

बुलढाणा,द प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांची पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, शेतातील जमिनीमध्ये किमान ६ इंच ओलावा अथवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे आवश्यक आहे. पुरेसा ओलावा नसताना घाईघाईने पेरणी केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे बियाण्यांचे अंकुरण कमी होण्याची किंवा अंकुर जळण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी शेतकरी धूळपेरणी करत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रकारची घाई टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या समाधानकारक पावसाची सुरुवात झाली असून, पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पेरणीचे नियोजन करावे. जमिनीतील उष्णता कमी होऊन आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानंतर सर्व प्रकारच्या खरीप पिकांची पेरणी करता येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष डाबरे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल..

सर्वांना निरोगी आयुष्य दे… बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे – विठुराया चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घातलं साकडं विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केली गेली आरोग्यदायी सेवा

आज बारामती विधानसभा पोट निवडणूक2026- राज्याचे उपमुख्यमंत्री उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांनी जिल्हा  परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला…

कॅनमधून पेट्रोल-डीझेल विक्री करणाऱ्या दोन पेट्रोल पंपांचा पुरवठा निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ‘एचपीसीएल’ची मोठी कारवाई

आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कठोर परिश्रमाची तयारी व अभ्यासात सातत्य ठेवा, यश हमखास मिळेल,कौतुक सोहळा : आमदार नारायण कुचे यांचा इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सल्ला…

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडीलयोजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन