
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका मध्ये नट्टू काका’ हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते.
मुंबई प्रतिनिधी
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील ‘नट्टू काका’ हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाची झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली असून त्यांनी रविवारी (३ ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांनी नट्टू काका यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आसित कुमार मोदी यांनी ट्वीट केले आहे. ‘ॐ शान्ति’ असे ट्वीट करत नट्टू काका यांचा फोटो ट्विटरवर शेअर केले आहे.



