vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंढरपूर यात्रेसाठी थेट आगार/गावांतून आषाढी एकादशी निमित्त खास बसेस उपलब्ध 

पंढरपूर यात्रेसाठी थेट आगार/गावांतून आषाढी एकादशी निमित्त खास बसेस उपलब्ध

जालना, प्रतिनिधी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रा दि. 20 जुलै 2026 ते दि. 30 जुलै 2026 या कालावधीत भरणार असून यात्रेचा मुख्य दिवस (आषाढी एकादशी) दि. 25 जुलै 2026 शनिवार हा आहे. तसेच गुरुपोर्णिमा दि. 29 जुलै 2026 रोजी आहे. या यात्रेच्या निमित्ताने थेट गावातून पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून खास रा.प. बसेस जालना विभागाकडून उपलब्ध करुन देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्याचे राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे.

पंढरपूर यात्रेकरीता भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगार प्रमुखांना प्रत्यक्ष भेटल्यास अथवा संपर्क केल्यास आपल्या गावांतून पंढरपूरसाठी जातांना व येतांना स्वतंत्रपणे रा.प.बसेस उपलब्ध करुन देण्यात येतील. यात्रेसाठी रा.प. महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, अमृत 75 वर्ष वयावरील या व इतर सर्व प्रवाशी सवलती लागू आहेत.

रा.प. महामंडळाच्या या योजनेचा खास यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात यात्रेचा फायदा होईल, खेडे गावांतील भाविकांचा प्रवास अधिक सुखकर व चांगला होण्यास मदत होईल याची योग्य ती दक्षता रा.प. महामंडळाकडून घेण्यात आली आहे. तर भाविक प्रवाशांनी कोणत्याही अनधिकृत खाजगी वाहनांतून प्रवास न करता रा.प. महामंडळाने खास आपणसाठी राबविलेल्या या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

vishwatmaklokswamivarta

राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदानज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘विनोबा’ उपक्रमाला बळ :31 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन आज होणार साजरा, मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता होणार ध्वजवंदन

vishwatmaklokswamivarta