vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र बंद पुकारण्याची महाविकास आघाडी ची भूमिका चुकीची; सरकारच राज्यात बंद कसा पुकारू शकते? — केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

*महाराष्ट्र बंद पुकारण्याची महाविकास आघाडी ची भूमिका चुकीची; सरकारच राज्यात बंद कसा पुकारू शकते? — केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी  – महाविकास आघाडी विरोधाला विरोध करण्याच्या राजकारणात इतके मश्गुल आहे की त्यांना भान राहिलेले नाही के ते राज्यात सरकार चालवीत आहेत. राज्य सरकार स्वतःच राज्यात बंद कसा पुकारू शकतात? सरकार ने बंद पुकारने ही महाविकास आघाडी ची चुकीची भुमीका आहे.त्याचा त्यांनी पुनर्विचार करावा.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र् बंद पुकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ना रामदास आठवले यांनी राज्यात सरकार चालविणारे महाराष्ट्र् बंद कसा पुकारू शकतात असा सवाल केला आहे.

लखीमपूर खेरी मधील हिंसाचाराचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे. लखीमपूर खेरी तील प्रकार निषेधार्ह दुःखद आणि मनाला चटका लावणारा आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी एस आय टी मार्फत चौकशी सुरू केली असून या प्रकरणी कोणीही दोषी असो त्यावर कठोर कारवाई निश्चित होईल. केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांचे नेते नवीन कृषी कायद्यांबबत चुकीच्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार नवीन कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना हवे ते बदल करण्यास तयार आहेत. मात्र कायदेच रद्द करा आधी आडमुठी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायद्यांबाबत सुचनांचे स्वागत करून कायद्यात सुधारणा करण्यास तयार आहे. त्यामुळे लोकशाहीत सर्वच प्रश्न आंदोलन करून सोडवताना काही प्रश्न चर्चा करून ही सोडविले पाहिजेत. लोकशाहित आंदोलन करणे योग्य मात्र शेतकरी नेते ज्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत तो आंदोलनाचा अतिरेक आहे असे ना रामदास आठवले म्हणाले. महाराष्ट्र् राज्य सरकार च्या सत्तारूढ पक्षांनीच महाराष्ट्र बंद ची हाक देणे चूक आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.

संबंधित पोस्ट

अक्षय्यतृतीया दिवशी तुमच्या शहरात इंधनाचे दर काय? घ्या जाणून

देवभूमीत महाप्रलय; २४ तासांत ५२ बळी, शिमल्यात मंदिरावर दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू….

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची विशेष भेट घेतली

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे सुरु होणार राज्यातील दुसरी चित्रनगरी; चित्रपट-मालिका निर्मिती, पर्यटनासह रोजगाराला मिळणार …

पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात येईल  – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठीआपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करायला हवेत   – जागृती सिंगला

vishwatmaklokswamivarta