vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

तासगाव तालुक्यातील हातनूर गावात अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

तासगाव तालुक्यातील हातनूर गावात अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सांगली, प्रतिनिधी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, तासगाव अंतर्गत हातनूर गावात अंगणवाडी मदतनीसचे 01 मानधनी पद भरण्यात येणार असून, पात्र व स्थानिक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी 4 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती तासगाव या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत. मुदत संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सतिश नवले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

हे मानधनी पद भरण्यासाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ताधारक पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशिल दर्शविणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत…

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी: ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ अंतर्गत ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

रिझर्व बँक ऑफ इंडिया’तर्फे गुरुवारी (दि.२०) ‘टाऊन हॉल बैठक’

आमदार संजय खोडके, सुलभा खोडके यांची कौशल्य विकास कार्यालयाला भेट