vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्नांना मिळणार व्यासपीठ;पालकमंत्री चंद्रकांत पाटील साधणार

शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्नांना मिळणार व्यासपीठ;पालकमंत्री चंद्रकांत पाटील साधणार नागरिकांशी संवाद

राज्य प्रतिनिधी : नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी सोडवल्या जाव्यात, या उद्देशाने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. हा नागरिक संवाद कार्यक्रम गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार आहे. गरजूंनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

            शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्न, नागरिकांच्या समस्या यांना या संवाद कार्यक्रमातून व्यासपीठ उपलब्ध होणार असून, या माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी थेट पालकमंत्र्यांसमोर मांडता येतील. तरी जिल्ह्यातील गरजूंनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाशी थेट संवाद साधून आपल्या अ़डचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कार्यपद्धती लोकाभिमुख राहिली आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेणे, संबंधित विभागांना आवश्यक सूचना देणे आणि कामकाजात गती आणण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे या संवाद कार्यक्रमातून नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

00000

 

 

 

संबंधित पोस्ट

१० लाख रुपयांची मदत बँक खात्यात जमा; मॅनहोल दुर्घटनेतील दिवंगत असलम शेख यांच्या पत्नीकडून पत्र लिहून महानगरपालिकेचे आभार-श्रीमती अंजुम शेख यांनी महापौरांप्रति व्यक्त केली कृतज्ञता

vishwatmaklokswamivarta

कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन-हिंदूंना प्रार्थनेची परवानागी नाकारल्याचा निषेधार्थ सेनेकडून घंटनाद सुरूच

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

vishwatmaklokswamivarta

पोलादपूर, महाड, माणगाव तालुका क्रीडा संकुलाच्या कामास गती द्यावी- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

राज्यांतर्गत पिकस्पर्धा-खरीप २०२६ : शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाद्वारे राज्यामध्ये गुंतवणूक व रोजगारवाढीस चालना- पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta