vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ५० वर्षांच्या मागणीला गती

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक५० वर्षांच्या मागणीला गती

मुंबई, प्रतिनिधी: – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यासाठी विधान भवनात उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक झाली. मुंबईस्थित कोल्हापूरकरांची गेल्या ५० वर्षांपासूनची मागणी विचारात घेऊन या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या स्मारकासाठी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी पुढाकार घ्यावा, असा निर्णय समितीच्यावतीने यावेळी घेण्यात आला

बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, आमदार राजेंद्र यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके तसेच कोल्हापूर जिल्हा फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष सूर्यकांत कडाकणे आणि पदाधिकारी उपस्थित होते. स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करून बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र देण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या

“राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी पुढाकार घेण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे,” अशी भावना यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केली.

००००

संबंधित पोस्ट

शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार…

४ तासांच्या कठीण शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून १० किलोचा गोळा काढला – स्त्रीरोगतज्ञ डॉ.राजश्री दयानंद कटके

vishwatmaklokswamivarta

वर्धा नदीवरील अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाई महसूलमंत्र्यांचे परिषदेत आश्वासन

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई,महोत्सवात नेत्रदीपक लेझर शो, टेंट सिंटी, पर्यटकांसाठी साहसी खेळ,विविध परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील नोकरभरती संदर्भात अहवाल सादर करावा- आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके