vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तिरुवनंतपुरम येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्र-केरळ सांस्कृतिक संगम,गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र व केरळच्या पारंपरिक कला-संस्कृतीचे सादरीकरण…

तिरुवनंतपुरम येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्र-केरळ सांस्कृतिक संगम,गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र व केरळच्या पारंपरिक कला-संस्कृतीचे सादरीकरण…

            मुंबई,  प्रतिनिधी : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या विविध भागांतील रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केरळमधील तिरुवनंतपुरम येथे करण्यात आले आहे. गुरुवार, 24 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत अभेदाश्रमम् हॉल, पद्मतीर्थमसमोर, श्री पद्मनाभस्वामी मंदिराजवळ, तिरुवनंतपुरम, केरळ येथे हा कार्यक्रम होणार आहे.       या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि केरळच्या सांस्कृतिक परंपरांचा सुंदर संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. गणेशोत्सवावरील सांस्कृतिक सादरीकरण, मराठी गीते, मल्याळम भाषेतील गीते, गणपतीची भक्तिगीते व भजने, केरळमधील ग्रामीण व पारंपरिक सांस्कृतिक कलाप्रकारांचे सादरीकरण तसेच महाराष्ट्र-केरळच्या कलाकारांचा सांस्कृतिक फ्युजन व संयुक्त कलाविष्कार या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.      केरळम् क्षेत्र संरक्षण समिती, महानगरम्, तिरुवनंतपुरम यांच्या समन्वयाने हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या लोकपरंपरांबरोबरच केरळच्या स्थानिक ग्रामीण आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण होणार असल्याने या कार्यक्रमातून दोन्ही राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची परस्पर ओळख आणि सांस्कृतिक देवाणघेवाण साधली जाणार आहे

        हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासोबतच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशाच्या विविध भागांत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

     कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून तिरुवनंतपुरम येथील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्र आणि केरळच्या सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा उपयुक्त  –जिल्हाधिकारी किशन जावळे

10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि अन्य तिघांना अटक

vishwatmaklokswamivarta

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या दोन प्रकल्पाचे लोकार्पण