
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील व ॲड. रवींद्र पाटील यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा….
महाराष्ट्र प्रतिनिधी : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील व ॲड. रवींद्र पाटील यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला, तर भाजपच्या खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचा अर्ज बाद झाला. जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर बुधवारी (ता. २०) सुनावणी झाली. त्या सुनावणीवर गुरुवारी (ता. २१) सकाळी दहाला निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी निकाल दिला. यात १३० अर्ज नामंजूर करण्यात आले, तर १४९ उमेदवारी अर्ज वैध ठरले.
भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा महिला राखीव व ओबीसी या दोन गटांतून उमेदवारी अर्ज बाद झाला, तर माजी आमदार स्मिता वाघ यांचा अमळनेर विविध कार्यकारी सोसायटी गटातून अर्ज बाद झाला. जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, भारती चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज भुसावळ विविध कार्यकारी सोसायटी गटातून बाद झाला.१३० अर्ज नामंजूरविविध गटांत तब्बल १३० अर्ज नामंजूर करण्यात आले. गटनिहाय नामंजूर झालेल्या अर्जाची संख्या अशी : अनुसूचित जाती- जमाती-६, इमाव-१४, महिला-२०, विजा/भ.ज.-११, इतर संस्था-२३, वि. का. सोसायटी : अमळनेर-६, चाळीसगाव-३, चोपडा-७, धरणगाव-२, मुक्ताईनगर-५, एरंडोल तीन, जळगाव-५ ,जामनेर-३, पाचोरा-४ ,पारोळा-३, बोदवड-४, भडगाव-३, भुसावळ-४, यावल-३, रावेर-१.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसाटीत केवळ ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांचा एकमेव अर्ज आहे. या गटतील नाना पाटील व दिलीप पाटील यांचा अर्ज बाद झाला. बोदवड गटात ॲड. रवींद्र पाटील व ॲड. रोहिणी खडसे यांचे अर्ज आहेत, तर अमळनेर विविध कार्यकारी सोसायटी गटात भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ व निवृत्ती पाटील यांचा अर्ज बाद झाला. यामुळे या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचाही बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला.महाविकास आघाडीचे सहा उमेदवार बिनविरोधमहाविकास आघाडीचे सहा जण बिनविरोध होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, शिवसेनेचे चिमणराव पाटील, अमोल चिमणराव पाटील बिनविरोध झाले आहेत. आता राष्ट्रवादी कााग्रेसचे एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील व ॲड. रवींद्र पाटील बिनविरोध होणार



