vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

तुम्ही पतंगबाजी करत राहा, आम्ही लवकरच खाते वाटप करु; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला

तुम्ही पतंगबाजी करत राहा, आम्ही लवकरच खाते वाटप करु; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला…

 

तुम्ही पतंगबाजी करत राहा आम्ही लवकरच खाते वाटप करु, खाते वाटपासंबंधी असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.

सरकार स्थापन होवून तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतर राज्याच्या मंत्री मंडळाचा  विस्तार झाला. आता मंत्रीमंडळाच्या खाते वाटपाचा मात्र अजूनही मुहूर्त लागेना. विरोधकांकडून यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.एवढचं नाही तर संबंधित मंत्री मंडळ विस्तारावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील आपली प्रतिक्रीया देत भाजपला घरचा अहेर दिला होता. 18 आमदारांचा शपथ विधी पार पडल्यानंतर आता कुणाला कुठलं खातं दिल्या जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलं आहे. तरी या संबंधीत कुठलीही अधिकृत घोषणा भाजप कडून करण्यात आली नाही पण आज पहिल्यांदाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियाना संबंधीत नागपूरात (Nagpur) आहेत. त्यांना खाते वाटपासंबंधी पत्रकारांनी प्रश्न विचारला असा फडणवीस म्हणाले, तुम्ही पतंगबाजी करत राहा आम्ही लवकरच खाते वाटप करु, असा खोचक टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे. तर महाराष्ट्र  भाजपत रोजचं महत्वाच्या घडामोडी बघायला मिळतात. कालचं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलारांना (Ashish Shelar) मुंबई भाजप अध्यक्ष (Mumbai City Chief) पदाची कमान सोपवण्यात आली आहे.

खाते वाटपाच्या प्रश्नावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले यांसारख्या बड्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तरी राज्यातील जनतेला देखील खाते वाटप कधी होणार असा प्रश्न पडला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात महापूरा सारख्या गंभीर समस्या उद्भवत असताना कुठल्याही भागात पालकमंत्री नाही ही राज्यासाठी चिंता जनक बाब आहे.

संबंधित पोस्ट

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम !अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्‍बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ समृध्‍द लोकशाहीसाठी आश्‍वासक बाब…

मुंबईतील धारावी विधानसभा क्षेत्रचे दोन दावेदार महाविकास आघाडीकाँग्रेस च्या डॉ.ज्योती गायकवाड उमेदवारी अर्ज दाखल तर शिवसेना उबाठाचे उमेदवार बाबुराव माने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…

vishwatmaklokswamivarta

भाजपा वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच भेट होणार; असल्याचा दावा दीपाली सय्यद ने ट्विटरवर केला

vishwatmaklokswamivarta

आदित्य ठाकरे यांच्या नव्या अंदाजावर आता शिवसेनेकडून ‘सेनेचा युवराज’ हे गाणं लॉन्च.

vishwatmaklokswamivarta

सतीश घाटगे पाटील सर्वात आदर्श लोकप्रतिनिधी…म्हणून माझा त्यांना पाठींबा – माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड,सतीश घाटगे यांचे व्हिजन जनहिताचे : टोपे, उढाण जनतेच्या प्रश्नांसाठी कधी आले नाही   

vishwatmaklokswamivarta

ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न…

vishwatmaklokswamivarta