vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारणस्थानिक बातम्या

सतीश घाटगे पाटील सर्वात आदर्श लोकप्रतिनिधी…म्हणून माझा त्यांना पाठींबा – माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड,सतीश घाटगे यांचे व्हिजन जनहिताचे : टोपे, उढाण जनतेच्या प्रश्नांसाठी कधी आले नाही   

सतीश घाटगे पाटील सर्वात आदर्श लोकप्रतिनिधी…म्हणून माझा त्यांना पाठींबा – माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड,सतीश घाटगे यांचे व्हिजन जनहिताचे : टोपे, उढाण जनतेच्या प्रश्नांसाठी कधी आले नाही

 

घनसावंगी: प्रतिनिधी  विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आग्रहामुळे अपक्ष निवडणूक लढवत असलेले समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांना सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यात मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी देखील मंगळवारी आपला जाहीर पाठिंबा त्यांना दिला आहे. घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील विकासाच्या प्रश्नासाठी सतीश घाटगे हे योग्य उमेदवार असून त्यांच्याकडे शस्वत विकासाचे व्हिजन असल्याने त्यांना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.

माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी देखील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, काही कारणास्तव त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तिकीट मिळाले नाही म्हणून शांत बसण्याऐवजी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सतीश घाटगे यांना पाठिंबा देत असल्याचे तानी जाहीर केले. हा पाठिंबा जाहीर करताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही संविधानिक पदावर नसताना सतीश घाटगे यांनी केलेले विकासाचे काम, विविध घटकांना केलेली मदत ही एका आदर्श लोकप्रतिनिधीं सारखी आहे. असाच लोकप्रतिनिधी घनसावंगी विधानसभेतील रखडलेले प्रश्न मार्गी लावू शकतो. मराठवाड्यात सतीश घाटगे यांच्यासारखे काम कोणत्याही लोकप्रतिनिधीला करता आलेले नाहीये. कोणत्याही पदावर नसताना त्यांनी केलेले हे काम कौतुकास्पद आहे. अशाच माणसाची घनसावंगी विधानसभेला गरज आहे.

टोपे, उढाण विकासाचे प्रश्न घेऊन कधीही आले नाही…. मी विभागीय आयुक्त असताना आमदार राजेश टोपे, हिकमत उढाण हे कधीही घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विकासाचे , जनतेचे प्रश्न घेऊन माझ्याकडे आले नाही. असेही त्यांनी सांगितले. घनसावंगी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे आणि या परिवर्तनासाठी एका चांगल्या माणसाच्या मागे उभे राहणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी सतीश घाटगे यांना माझा पाठिंबा दिला आहे. या लढाईत मी त्यांच्या सोबत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले

संबंधित पोस्ट

दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न दिव्यांग मतदारांचे क्षेत्रीयस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजना- जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

आरोग्य विभागाच्या वतीने ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ मोहीम राबवणार

vishwatmaklokswamivarta

जनसामान्यप्रेमी आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वातील जनता दरबारास ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद… 

जिल्ह्यात 1509 मतदान केंद्रांचे होणार वेबकास्टिंग- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

वैशिष्ट्यपूर्ण कृषि उत्पन्न घेणाऱ्या गावांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देणार*    *- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यात दीड वर्षात पाच हजार कोटींची कामे प्रगतिपथावर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

vishwatmaklokswamivarta