
जॅकलिन-सुकेश होते रिलेशनशिपमध्ये’, वकीलाचा दावा
मुंबई प्रतिनिधी:
मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेत्री नोरा फतेही यांना ईडीने समन्स पाठवला होता. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर हे मुख्य आरोपी आहेत. पण आता या प्रकरणाला नवीन वळण आलं आहे. जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये होते, असा दावा सुकेशचे वकिल अनंत मलिक यांनी केला आहे.यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनची दोनदा चौकशी केली आहे. तसेच याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.
सुकेशचे वकिल अनंत मलिक म्हणाले, “जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश एकमेकांना डेट करत होते. मी हे जे बोलतोय ते अगदी खरं आहे.” नंतर नोरा विषयी बोलताना ते म्हणाले,” नोरा फतेही स्वत:ला पीडित म्हणवत आहे, पण सत्य हे आहे की तिला BMW कार गिफ्ट करण्यात आली होती. खरं तर नोरा आणि जॅकलिन या दोघीही या प्रकरणातील महत्त्वाच्या दुवा आहेत, आणि त्यामुळेच त्यांना प्रश्नोत्तरासाठी बोलावले जात आहे.”



