vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढवावी, शौचालये दुरुस्ती डागडुजीला शासन करणार सर्व मदत’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढवावी, शौचालये दुरुस्ती डागडुजीला शासन करणार सर्व मदत’… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र प्रतिनिधी

, राज्यातील अनेक गावे स्वच्छ आणि समृद्ध होत आहेत. राज्यात वैयक्तिक शौचालये बांधण्याची मोहीम सुरू आहे. पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक शौचालये उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.

 

संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त होण्यासाठी यावर्षी शौचालये बांधण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकांनी स्वच्छतेला महत्त्व देऊन स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी म्हणून राज्यात या मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता व ग्रामसभा दिंडी समारोप कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात संपन्न झाला.

शिंदे म्हणाले की,  राज्यातील अनेक गावे स्वच्छ आणि समृद्ध होत आहेत. राज्यात वैयक्तिक शौचालये बांधण्याची मोहीम सुरू आहे.  पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक शौचालये उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. तसेच यापूर्वी बांधलेली शौचालये दुरुस्ती अभावी वापराविना पडून राहू नये यासाठी दुरुस्ती व डागडुजीला शासन मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छता दिंडीचा गेल्या 17 वर्षापासून पुणे ते पंढरपूर एक चांगला उपक्रम सुरु आहे. या दिंडीच्या माध्यमातून राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये सामाजिक प्रबोधन केले जात आहे. या माध्यमातून प्रत्येक गावात ग्राम स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी व त्यातून ग्रामीण भागाचे जीवनमान स्तर उंचावण्यास मदत मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच केंद्र शासनाच्या संकल्पनांची ग्रामीण भागात अंमलबजावणी करून शाश्वत विकास करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी म्हटले. ‘स्वच्छता वारी निर्मल वारी’ हा उपक्रम अत्यंत चांगला असून यातून ग्रामीण भागाच्या विकासात मदत होणार असल्याची माहिती श्री.शिंदे यांनी देऊन या स्वच्छता दिंडीत सहभागी असणाऱ्या कलाकारांचे कामही प्रभावी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

संबंधित पोस्ट

मातंग व तत्सम पोटजातीतील नावावर शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

नवीन दारू धोरणावर अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लिहिले पत्र…

प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय आणि त्रास देणाऱ्या विमान उड्डाणांच्या मोठ्या प्रमाणात व्यत्ययाबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने डीजीसीए इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि अकाउंटेबल मॅनेजर इसिड्रो पोरकेरास यांना कारणे दाखवा नोटीस

vishwatmaklokswamivarta

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती राज्यभर उत्साह; मुख्यमंत्र्यासह दिग्गजांचे अभिवादन

राज्यात जीबीएसचा धोका कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta