vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मातंग व तत्सम पोटजातीतील नावावर शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन.

मातंग व तत्सम पोटजातीतील नावावर शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन.

 

 

 

राज्य प्रतिनिधी:- जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील ज्या व्यक्तींच्या नावे शेतजमीन आहे. अशा व्यक्तींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयात गुरुवार दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीमधील शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींनी दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.15 या कार्यालयीन वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे अर्जदाराने स्वत: उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे. अर्जासोबत शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.02482 224902 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

दिवाळीच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, मुंबईकरांना संपाचा फटका

vishwatmaklokswamivarta

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी मार्चपूर्वी शंभर टक्के खर्च करा – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल*

आठवड्याभरात हैद्राबादमध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !* – हिंदु जनजागृती समिती

८ मार्च महिला दिना निम्मीत्त मुख्य डाकघर छत्रपती संभाजीनगर येथे बचत महामेळाव्याचे आयोजन – श्री सुरेश बन्सोडे